सामान्य जनतेच्या सरकारबाबतच्या भावना जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळांवरील पोस्ट्स म्हणजे प्रतिसादाचा वापर करून त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचा नव माध्यम विभाग भावना विश्लेषण करीत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर जनतेला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी समाज माध्यमांचा वापर सरकारकडून केला जात आहे.
 समाज माध्यमात (उदा. फेसबुक, ट्विटर) लोक ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात त्या महत्त्वाच्या आहेत असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऑनलाईनवर आलेल्या प्रतिसादांच्या संख्येपेक्षा सकारात्मक, नकारात्मक व तटस्थ प्रतिक्रियांचा विचार माहिती व प्रसारण मंत्रालयाचा नवमाध्यम विभाग करीत आहे, लोकांच्या भावनांचे विश्लेषण करण्यासाठी त्यात प्रयत्न केले जात आहेत.
माहिती व प्रसारण मंत्रालयाला सरकारची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा व लोकांचा प्रतिसाद घेण्याचा अधिकार आहे. ब्लॉग, मेसेज बोर्ड, मायक्रोब्लॉग (ट्विटर) यासारख्या आकृतीबंधांचा विचार त्यात केला जात आहे. माहिती व प्रसारण खात्याचे सचिव बिमल जुल्का यांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांचे महत्त्व सरकारला पटले आहे. त्यामुळे आम्ही प्रतिसादाचा अभ्यास करीत आहोत. तुलनात्मक आकडेवारी बघता स्वच्छ भारत अभियानाला ३ लाख पोस्ट आल्या आहेत. सामाजिक माध्यमातून ही योजना ५२.०६ कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यात ५३ टक्के प्रतिसाद सकारात्मक, पाच टक्के नकारात्मक तर उर्वरित तटस्थ आहेत. डिजीटल इंडिया कार्यक्रमावर ३९ टक्के प्रतिसाद सकारात्मक, ५१ टक्के तटस्थ तर १० टक्के नकारात्मक आहेत.
विविध योजनांबाबत विश्लेषण                       
*स्वच्छ भारत अभियान-५३ टक्के सकारात्मक, ५ टक्के नकारात्मक, उर्वरित तटस्थ
*डिजिटल इंडिया -३९ टक्के सकारात्मक, ५१ टक्के तटस्थ , १० टक्के नकारात्मक
*मेक इन इंडिया -९२ टक्के तटस्थ व सकारात्मक व ८ टक्के नकारात्मक