News Flash

तनिष्कच्या ‘त्या’ जाहिरातीला पाठिंबा दिल्याने चेतन भगतवर भडकले नेटकरी

चेतन भगत बिनधास्तपणे कुठल्याही विषयांवर आपली मत व्यक्त करीत असतात.

दागिन्यांचा प्रसिद्ध ब्रँड तनिष्कने केलेल्या एका जाहिरातीवरुन सोशल मीडियात त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांच्या जाहिरातीत हिंदू-मुस्लिम असा संवेदनशील विषय असल्याने तनिष्कला टीकेनंतर आपली जाहिरात मागे घ्यावी लागली. मात्र, काही सेलिब्रिटींनी तनिष्कच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचाही समावेश असून त्यांनी या जाहिरातीला पाठिंबा दर्शवत तनिष्कला ट्रोल करणाऱ्यांवर ट्विटरवरुन सडकून टीकाही केली. मात्र, त्यांच्या ट्विटवरुन नेटकरी चांगलेच भडकले आणि त्यांनी भगत यांनाही ट्रोल केले.

भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं की, “डिअर तनिष्क बहुतेक लोक तुमच्यावर यासाठी हल्ला करीत आहेत कारण ते तुमचे दागिने विकत घेऊ शकत नाहीत. त्यांची विचारसरणी या अर्थव्यवस्थेला कुठे घेऊन जाईल हे यावरुन कळतं. रोजगार नसल्याने ते नोकरीही करु शकत नाहीत त्यामुळे भविष्यातही ते तनिष्कमधून दागिने खरेदी करण्यास सक्षम असणार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांची चिंता करु नका.

आणखी वाचा- “इतकी विशाल कंपनी अन्…”; त्या जाहिरातीमुळे स्वरा भास्कर ‘तनिष्क’वर नाराज

चेतन भगत यांनी केलेल्या या ट्विटवरुन नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले. त्यांना प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटलं की, “तनिष्कवर कोण हल्ला करीत आहे. त्यांच्या कुठल्याही शोरुमवर कोणीही दगड फेकलेला नाही. त्यांच्या कुठल्याही एक्झिक्युटिव्हला कोणीही शिवी दिलेली नाही, हल्ला केलेला नाही. ग्राहकांची आपली निवड आहे, ग्राहकांना हक्क आहे बहिष्कार घालण्याचा, जसं तुम्ही तुमच्या मेंदूचा केला लहानपणापासून.”

आणखी वाचा- तनिष्कने ‘ती’ जाहिरात हटवल्यानंतर दिग्दर्शक ओनिर म्हणतात…

विनोद नावाच्या एका युजरने म्हटलं, “कॉर्पोरेटला जाहिरात बनवायला पाहिजे पण धर्मामध्ये छेडछाड न करता. तुमच्या जाहिरातीमध्ये ती क्षमता आणि बाब असायला हवी.” दुसरा एकजण म्हणाला की, “याला काय माहिती आमच्या पीठ आणि तांदळाच्या डब्यांमध्ये बटाटे-टमाट्यांप्रमाणे सोनं आणि पैसे पडून असतात.”

आणखी वाचा- “एक हिंदू म्हणून आपण अशा Creative Terrorists पासून…”; तनिष्क प्रकरणावरुन कंगना संतापली

अनुषा नावाच्या एका युजरने म्हटलं, “छान क्लासिक कमेंट आहे. लाज वाटायला हवी ज्या पद्धतीने तुम्ही तनिष्कची पाठराखण करीत आहात. तुम्ही त्या लोकांवर टीका करीत आहात जे या जाहिरातीवर नाराज आहेत. तुम्ही या प्रकरणाला आर्थिक स्टेट्सचा मुद्दा बनवलात. तुम्ही श्रीमंत आहात याचा अर्थ असा आजिबात नाही की तुम्ही हुशार आहात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:51 pm

Web Title: social media users got angry with chetan bhagat for supporting tanishqs that advertisement aau 85
Next Stories
1 ‘तनिष्क’च्या शोरूमवर कोणताही हल्ला झालेला नाही, पोलिसांनी केलं स्पष्ट
2 पँगाँग तलावात भारताने पाण्याखालून चाल करु नये, म्हणून चीन….
3 झटका, अमेरिकेत २४ तासात जॉन्सनच्या लशीपाठोपाठ आणखी एका औषधाची थांबवली चाचणी
Just Now!
X