27 February 2021

News Flash

धावत्या कारमध्ये सैनिकाने मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून केली हत्या

लष्करी सेवेत असलेल्या जवानाने धावत्या गाडीत मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून हत्या केली.

लष्करी सेवेत असलेल्या जवानाने धावत्या गाडीत मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून हत्या केली. नंतर स्वत:ला संपवले. पाटण्याच्या सायदाबाद भागात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. विष्णू कुमार शर्मा (३३) असे मृत जवानाचे नाव असून तो गुजरातमध्ये तैनात होता. अलीकडे सुट्टीवर तो घरी आला होता.

विष्णूने पत्नी दामिनी आणि तिची बहिण डिम्पल शर्माची गोळी झाडून हत्या केली. पालीगंजचे पोलीस उपधीक्षक मनोज कुमार पांडे यांनी ही माहिती दिली. दोघींची हत्या केल्यानंतर विष्णूने स्वत:वर गोळी झाडली. मागच्या दोन महिन्यांपासून विष्णू डेंग्युच्या तापाने त्रस्त होता. आजारपणामुळे त्याची चिडचिड सुद्धा वाढली होती. उपचारासाठी म्हणून तो पाटण्याला आल्याचे तपासातून समोर आले आहे.

गाडीमध्ये विष्णूसोबत त्याची मुले सुद्धा होती. मुले आजोबांसोबत पुढच्या सीटवर बसल्याने बचावली. घटनास्थळावरुन पोलिसांनी बंदूक, विष्णूचे ओळखपत्र आणि कार ताब्यात घेतली आहे. हत्येसाठी जी बंदूक वापरली त्याचा परवाना होता. वडिलांनी आधी मावशीवर गोळी झाडली त्यानंतर आई आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. आजोबा कसेबसे गाडीतून उतरले व त्यांनी स्थानिकांची मदत घेतली असे विष्णूच्या मोठया मुलाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 4:20 pm

Web Title: soldier kills wife shoots himself in front of kids in running car dmp 82
Next Stories
1 ‘रणथंबोर’मधील थरार; जेव्हा वाघ पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करतो
2 चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगी सरकार करणार ६३ हजार झाडांची कत्तल
3 अयोध्या खटला: जमियत उलेमा-ए-हिंदकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल
Just Now!
X