25 October 2020

News Flash

NEET परीक्षेत शून्य गुण मिळूनही ते होणार डॉक्टर

जवळपास ४०० विद्यार्थ्यांना एक अंकी मार्क मिळाले

संग्रहित छायाचित्र

आपल्याकडे शिक्षण आणि प्रत्यक्ष त्याविषयातील काम याचा तसाही फार कमी संबंध असतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीवरुन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. २०१७ या वर्षी NEET परिक्षेत शून्य मार्क मिळूनही ११० विद्यार्थ्यांनी खासगी महाविद्यालयामध्ये वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतला होता. यामध्ये जवळपास ४०० विद्यार्थ्यांना एक अंकी मार्क मिळाले होते. अशाप्रकारे शून्य मार्क मिळूनही हे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र कसे ठरले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तावरुन ही माहिती समोर आली आहे. NEET या परिक्षेला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे तीन विषय असतात. या प्रत्येक विषयात किंमान ५० टक्के असणे आवश्यक असते.

NEET परिक्षेतून वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतलेल्यांपैकी १९९० विद्यार्थ्यांना ७२० पैकी १५० हून कमी मार्कस आहेत. त्यातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा या दोन्ही विषयात ५३० जण हे एक अंकी गुण, शून्य किंवा त्याहून कमी मार्क असणारे आहेत असे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. या ५३० पैकी ५०७ जणांनी खासगी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. या सर्वांनी भरलेली फी वर्षाला अंदाजे १७ लाख इतकी आहे. यामध्ये हॉस्टेल, मेस, लायब्ररी आणि इतर गोष्टींचा समावेश नाही. त्यामुळे हे विद्यार्थी किती श्रीमंत असतील हे लक्षात घ्यायला हवे.

यातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थी हे अभिमत विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते ठरवतील तेव्हा होतात. या परीक्षा दिल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करण्याची परवानगी असते. NEET ही सर्वात पहिल्यांदा २०१० मध्ये लागू करण्यात आली होती. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाने या परीक्षेत प्रत्येक विषयात विद्यार्थ्याला ५० मार्क असणे तसेच आरक्षित विद्यार्थ्यांना किमान ४० मार्क असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ० आणि त्याहून कमी गुण असणारे विद्यार्थी जर भविष्यात डॉक्टर होऊन आपल्याला वैद्यकीय सुविधा देणार असतील तर त्यांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 4:17 pm

Web Title: some mbbs students got 0 or less in neet exam still doing their education
Next Stories
1 पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी अमेरिकेत नसल्याची इंटरपोलची माहिती
2 २ वर्षांच्या मुलीला विकण्याच्या तयारीत असलेल्या आईला ४० वर्षांचा तुरुंगवास
3 हिरव्या झेंडयावर बंदी घाला! सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Just Now!
X