News Flash

दीपक भारद्वाज हत्येप्रकरणी त्यांच्या मुलास अटक

बसपाचे नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येचा कट त्यांचा मुलगा नितीश (३१) यानेच रचल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. या कृत्याची कार्यवाही करण्यासाठी

| April 10, 2013 04:40 am

बसपाचे नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येचा कट त्यांचा मुलगा नितीश (३१) यानेच रचल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. या कृत्याची कार्यवाही करण्यासाठी नितीश याने बलजीतसिंग शेरावत (५१) या वकिलास पाच कोटी रुपयांची सुपारी दिली होती, परंतु नंतर बलजीतने ही जबाबदारी एका कथित स्वामीवर सोपविली होती. नितीश याच्यासमवेत शेरावत यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दीपक भारद्वाज यांनी नितीश याला फार्महाऊसवर येण्यास बंदी घातली होती तसेच त्याला संपत्तीमधील त्याचा वाटा देण्यासही नकार दिला होता. या गोष्टींचा राग मनात ठेवून नितीशने हे कारस्थान घडवून आणले, असा पोलिसांचा संशय आहे. तर शेरावत याला निवडणूक लढविण्यासाठी निधी हवा होता, परंतु नंतर त्याचा इरादा बदलून त्याला पाच कोटी रुपयांची निकड भासू लागली. याप्रकरणी, शेरावत याने ही जबाबदारी ज्याच्यावर सोपविली होती तो स्वामी प्रतिभानंद फरार असून अन्य दोघे संशयित शूटर पुरुषोत्तम राणा व सुनिल मान यांना अटक करण्यात आली आहे.
सन २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीपक भारद्वाज यांनी ६०० कोटी रुपयांहून अधिक आपली मालमत्ता असल्याचे घोषित केल्यामुळे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून ते सर्वपरिचित झाले होते. मात्र कौटुंबिक तणावांमुळे नितीश याला कुटुंबीयांसमवेत संपर्क साधण्यास तसेच फार्महाऊसवर येण्यासही त्यांनी बंदी घातली होती. गेल्या २६ मार्च रोजी दक्षिण दिल्लीतील राजोकरी येथील फार्महाऊसवर भारद्वाज यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. हे फार्महाऊस नितीश याच्याच नावावर आहे. ही हत्या राणा व मान यांनीच केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वकील शेरावत याच्याशी नितीश याने संधान बांधले होते.  शेरावतला निवडणूक लढविण्यासाठी प्रारंभी पैसे हवे होते, परंतु त्याचा इरादा नंतर बदलला आणि हे कट कारस्थान सफल करण्यासाठी त्याने नितीशकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली. याच दरम्यान स्वामी प्रतिभानंद याचेही शेरावतसमवेत लागेबांधे होते आणि आपला आश्रम उभारण्यासाठी या स्वामीला पैशांची गरज होती. हे कृत्य पार पाडण्यासाठी या स्वामीने राणा आणि मान यांना तयार केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2013 4:40 am

Web Title: son arrested on deepak bharadwaj murder case
Next Stories
1 भूसंपादन विधेयकवर पुन्हा सर्वपक्षीय बैठक
2 धक्काबुक्कीनंतर ममता बॅनर्जींचा राग अजून कायम; अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द
3 मध्य प्रदेशात महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये भाजपचा नगरसेवक
Just Now!
X