11 July 2020

News Flash

आई, बहिण आणि वहिनीवर बलात्कार करणाऱ्या दारुड्या मुलाची कुटुंबाकडून हत्या

पोलिसांनी मृताचे वडील, पत्नी, भाऊ आणि वहिनी यांना अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

दारुच्या नशेत आई, बहिण आणि भावाच्या पत्नीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या मुलाची कुटुंबाकडूनच हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दातिया येत ही घटना घडली आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी कुटुंबातील चार सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांना १२ नोव्हेंबर रोजी २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह गोपालदास हिल परिसरात आढळला होता. यासंबंधी कुटुंबाकडे चौकशी केली असता त्यांनी हत्या केली असल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी गीता भारद्वाज यांनी दिली आहे.

गीता भारद्वाज यांनी सांगितल्यानुसार “१२ नोव्हेंबर रोजी आम्हाला मृतदेह आढळला. शवविच्छेदन केलं असता हत्या करण्यात आली असल्याचं उघड झालं. मृतदेहाची ओळख पटली असता त्याला दारुचं व्यसन होतं आणि कुटुंबीय त्याला त्रासले होते अशी माहिती समोर आली. कुटुंबाकडे चौकशी केली असता त्यांनी आई, बहिण आणि वहिनीवर बलात्कार केला म्हणून त्याची हत्या केली असल्याची कबुली दिली”.

मृताच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, “११ नोव्हेंबर रोजी मुलगा दारुच्या नशेत घरी आला आणि भावाच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने याआधीही अनेकदा असा प्रयत्न केला होता. म्हणूनच आम्ही त्याची हत्या केली आणि मृतदेह गोपालदास हिल येथे टाकला”. पोलिसांनी मृताचे वडील, पत्नी, भाऊ आणि वहिनी यांना अटक केली आहे. चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 4:20 pm

Web Title: son kiiled by family for raping mother sister and sister in law in madhya pradesh sgy 87
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ‘पूर्ण न्याय’ नाही : ओवेसी
2 १२ वर्षीय मुलीला शबरीमला मंदिरात नाकारला प्रवेश
3 सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
Just Now!
X