आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरूंगात असलेल्या माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तिहार तुरूंगात पोहचले आहे. गेल्या एका महिन्यापासून चिदंबरम हे तुरूंगात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएनएक्स मीडियातील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली होती. २१ ऑगस्ट रोजी सीबीआय आणि ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. महिनाभरापासून चिदंबरम तुरूंगात असून,  गेल्या आठवड्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान, चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सोमवारी सकाळी नऊ वाजता तिहार तुरूंगात दाखल झाल्या आहेत. ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांच्या पाठिंशी काँग्रेस असल्याचे दर्शवण्यासाठी सोनिया गांधी या चिदंबरम यांच्या भेटीला आल्याचं वृत्त आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना सुरूवातीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. सीबीआयबरोबरच सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi and former pm dr manmohan singh at tihar jail to meet p chidambaram bmh
First published on: 23-09-2019 at 09:22 IST