News Flash

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची सोनियांची मागणी

गरीब शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये लक्ष घालण्याची जबाबदारी केंद्र आणि हरयाणा सरकारची आहे.

| March 22, 2015 04:11 am

गरीब शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये लक्ष घालण्याची जबाबदारी केंद्र आणि हरयाणा सरकारची आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याची वेळेतच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी येथे केली.
शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत, मात्र हा अन्नदाताच संकटात सापडल्याने आपण सर्वजण दु:खी आहोत. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था पाहता आपण सर्वानी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची गरज आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सध्या काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून एनडीए सरकारच्या भूसंपादन विधेयकालाही काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे सोनिया यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले
आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्याची मुख्य जबाबदारी सरकारची आहे. केंद्रात आणि हरयाणात आमचे सरकार नाही तरीही शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळेल यासाठी आम्ही लढा देऊ, असेही त्यांनी रोहतकमधील रथनथल गावांत शेतकऱ्यांना सांगितले.
‘दहशतवादाला थारा न देण्याचे केंद्राचे धोरण’
जम्मू: दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून, सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याबाबतचा निर्णय राजकीय विचारांनी घेतला जाऊ शकत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. संवेदनशील मुद्दय़ावरील निर्णय –  तो कायम राखणे किंवा मागे घेणे- हे राजकीय विचारांनी भुलून जाण्यापेक्षा सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घेणे आवश्यक आहे. राजकीय विचारांपलीकडे जाऊन या मुद्दय़ाचा पुनर्विचार करून आपण हे समजून घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:11 am

Web Title: sonia gandhi meets haryana farmers hit by unseasonal rains
Next Stories
1 काश्मीर सरकारवर तोगडियांची टीका
2 निवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी रद्द होणार?
3 विकासकामांसाठी वेळच मिळत नाही – नवाझ शरीफ
Just Now!
X