27 February 2021

News Flash

खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा – सोनिया गांधी

काही महिने ७,५०० रुपये देण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी. (संग्रहित छायाचित्र)

स्थलांतरित मजुरांच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. स्थलांतरित मजुरांचा विषय हाताळण्यामध्ये सरकार कमी पडले असे काँग्रेसचे मत आहे. स्थलांतरित मजुरांच्या विषयाकडे मोदी सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशव्यापी लॉकडाउनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले, त्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुरेशी पावले उचलली नाहीत असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

“करोना व्हायरसमुळे मागच्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाखो मजूर उपाशीपोटी, कुठल्याही औषधांशिवाय शेकडो किलोमीटरची पायपीट करुन घरी परतण्यासाठी मजबूर आहेत” असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

“कोटयावधी लोक बरोजगार झालेत, कारखाने बंद झाले आहेत. पण कदाचित सरकारला याची कल्पना नसावी. आमची केंद्राला विनंती आहे, तुम्ही खजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा. काही कुटुंबांना दर महिन्याला ७,५०० रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या आणि त्यात १० हजार रुपये तात्काळ द्या” अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 1:19 pm

Web Title: sonia gandhi slams modi govt over migrant labourer crisis dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बाप रेल्वे स्थानकात दूध शोधत असताना चिमुकल्यानं सोडला जीव
2 सीमावादात कोणाची मध्यस्थता स्वीकारायची, हे भारत-चीन ठरवतील, संयुक्त राष्ट्राची भूमिका
3 नोकियाचे ४२ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह; कंपनीनं बंद केला प्रकल्प
Just Now!
X