News Flash

अजान सुरू होताच सोनिया गांधींनी भाषण थांबवले

इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमातील घटना

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अलाहाबादला आल्या होत्या. या कार्यक्रमात सोनिया गांधींचे भाषण सुरू असताना अजानला सुरुवात झाली. अजानला सुरुवात होताच सोनिया गांधींनी त्यांचे भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर सोनिया गांधींनी पुन्हा त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रादेखील उपस्थित होते.

‘इंदिरा गांधींना नेहमीच देशाला भक्कम स्थितीत कसे न्यायचे, याची चिंता असायची. जिथे सर्व सुरक्षित असतील, असा देश त्यांना बनवायचा होता. आपल्या सर्वांना पुढे जाण्याची संधी मिळावी, असा देश इंदिरा गांधींना हवा होता. सर्वांना अभिमान वाटेल, अशा देशाची निर्मिती हे इंदिरा गांधींचे स्वप्न होते,’ अशा शब्दांमध्ये सोनिया गांधींनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

‘दोन दिवसांपासून आपण इंदिरा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करायला सुरुवात केली. या कार्यक्रमात इंदिरा गांधींच्या आयुष्याशी संबंधित छायाचित्रे आहेत. शताब्दी वर्षादरम्यान हे प्रदर्शन अन्य ठिकाणीदेखील नेण्यात येईल. याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या बालपणीचा काळ व्यतीत केला. याच ठिकाणी स्वातंत्र्याच्या लढ्यातील अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. याच ठिकाणी त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांना देशासाठी प्राण गमावल्यावर याच ठिकाणी त्यांचे पार्थिव आणण्यात आले,’ अशा शब्दांमध्ये सोनिया गांधींनी इंदिरा गांधीच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 10:45 am

Web Title: sonia gandhi stops speech covers head for azaan in allahabad
Next Stories
1 पोटनिवडणूक निकाल: मध्यप्रदेश, आसाम, अरुणाचलमध्ये भाजप विजयी
2 नसली वाडियांकडून टाटा सन्सविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस
3 Japan Earthquake: जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीवर त्सुनामी
Just Now!
X