News Flash

राहुल गांधी अमेठी तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर

संग्रहित छायाचित्र

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यापैकी ११ उमेदवार हे उत्तर प्रदेशचे आहेत तर ४ उमेदवार गुजरात येथील आहेत. काही वेळापूर्वीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. फारुकाबादमधून सलमान खुर्शीद लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता होती. त्या अद्याप पर्यंत झालेल्या नाहीत. निवडणुका किती टप्प्यात होणार? त्याच्या तारखा काय असणार? निकालाची तारीख काय असणार हे सगळं स्पष्ट व्हायचं आहे. दरम्यान काँग्रेसने आता पहिली यादी जाहीर केली आहे.लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच रंगणार आहे. अशात आता काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 9:54 pm

Web Title: sonia gandhi to contest from rae bareli and rahul gandhi to contest from amethi
Next Stories
1 जम्मूतल्या ग्रेनेड हल्ल्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन, दहशतवादी ओमर अटकेत
2 हाफिज सईदवरील बंदी हटवण्यास संयुक्त राष्ट्राचा नकार
3 पुलवामा हल्ला मोदी आणि इम्रान खान यांनी ‘फिक्स’ केला, काँग्रेस नेत्याचा आरोप
Just Now!
X