14 December 2017

News Flash

सोनिया गांधींनी घेतली पिडीत मुलीची भेट

दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित

दिल्ली | Updated: December 19, 2012 11:54 AM

दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून घडलेली बत्काराची घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सदर पिडीत युवतीवर अतिदक्षताविभागात उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांनी पिडीत मुलीची सफदरजंग इस्पितळात जाऊन भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची चौकशी केली. सोनिया गांधी इस्पितळात १५ ते २० मिनिटे होत्या व त्यांनी युवतीच्या कुटूंबीयांशीही संवाद साधला. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डाँक्टरांकडुन त्यांना समजले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत. 

First Published on December 19, 2012 11:54 am

Web Title: soniya gandhi meet to victim