News Flash

एस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध

कुमार बंगारप्पा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत

| April 21, 2018 02:12 am

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी म्हैसूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

बंगळूरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचा खरा राजकीय वारसदार कोण हे सिद्ध करण्यासाठी त्यांचे दोन पुत्र १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत सोरबा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कुमार बंगारप्पा आणि मधू बंगारप्पा हे सोरबा मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. एस. बंगारप्पा यांनी १९६७ ते १९९४ या कालावधीत सदर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

कुमार बंगारप्पा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत तर मधू बंगारप्पा हे याच मतदारसंघातील विद्यमान आमदार असून ते जद(एस)च्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसने राजू एम. तल्लूर यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही भावांमधील संघर्ष  नेहमीचा आहे.

भाजपच्या नव्या यादीत रेड्डी बंधूंना स्थान

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आणखी ५९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये हरपनहळी येथून करुणाकर रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत दोन रेड्डी बंधूंचा समावेश होता. बेकायदा खनन प्रकरणात रेड्डी बंधूंवर आरोप झाले होते. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे महत्त्व कमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:12 am

Web Title: sons of former cm bangarappa contesting poll against each other in karnataka
Next Stories
1 पाकिस्तान सुधारत नाही, तोपर्यंत सीमेवर इंडियन आर्मीचे ‘स्पेशल ऑपरेशन्स’च चालूच राहणार
2 कर्करोग निदानासाठी कमी वेदनादायी चाचणी
3 जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन
Just Now!
X