२०२० मध्ये कोविड – १९ या साथीच्या रोगामुळे बऱ्याच नागरिकांना त्रास सहन करावे लागले होते. सोनू सूदने यावेळी गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यामुळे भारतातील लोकांनी त्याला ‘खरा नायक’ म्हणून घोषित केले होते. सूदने संबंधित राज्य सरकारकडून परवानगी घेतल्यानंतर प्रवासी कामगारांसाठी विशेष बसेसची व्यवस्था केली होती. परप्रांतीय कामगारांना घरी पाठवण्याव्यतिरिक्त सोनू सूद याने अन्नदानाचा उपक्रम देखील सुरू केला होता आणि पंजाबमधील डॉक्टरांना १५०० पीपीई किट्सचे दान केले.

सोनू सूदच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर अभिनेत्याचे छायाचित्र देखील लावण्यात आली आहे.

स्पाइसजेट आणि सोनू सूद यांनी गेल्या वर्षी महामारीच्या सुरूवातीपासूनच परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांच्या मदतीसाठी एकत्र काम करण्यास सुरू केले होते. या सहकार्याचा भाग म्हणून, किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि रशिया, उझबेकिस्तान, मनिला, अलमाटी या देशांमधील अडकलेल्या शेकडो भारतीय नागरिकांना भारतात परत अणण्यात आले होते.

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये स्पाइसजेटने म्हटले आहे की, “ जागतिक महामारीच्या वेळी सोनू सूद हा लाखो भारतीयांचा मसिहा बनला होता. त्याने लोकांना आपल्या प्रियजनांना भेटावण्यासाठी, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला अन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्याच्या या अफाट कार्यासाठी आणि त्याचे आभार मानण्यासाठी स्पाइसजेटकडून एक छोटीशी भेट देत आहोत. आम्ही सोनू सूदचे छायाचित्र असलेलं एका प्रवासी विमानाचे अनावरण करत आहोत.”

स्पाइसजेट पुढे म्हणाली, “सोनू, केलेल्या सर्व गोष्टींद्दल तूझे मनापासून धन्यवाद! तू आमच्यासाठी आणि बर्‍याच जणांसाठी प्रेरणा आहेस आणि तुझ्या विलक्षण कृतीत आम्ही भागीदार झालो याचा आम्हाला अभिमान आहे.”

यामुळे सोनू सूद आनंदित झाला आणि म्हणाला, “या आश्चर्यकारक गोष्टीमुळे मी स्पाइसजेटचा अत्यंत आभारी आहे. लॉकडाऊन दरम्यान या विमान कंपनीने एक दिवससुद्धा काम थांबवले नाही, ते स्पाइसजेट होते, ज्याने देशाला लागणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याची योग्य ती काळजी घेतली. स्पाइसजेटच्या अथक आणि अनमोल सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ज्यामुळे हजारो अडकलेल्या भारतीयांना त्यांच्या कुटूंबियात पुन्हा एकत्र येण्यास मदत झाली. ”

गेल्या वर्षभरात सोनू सूदने विविध क्षेत्रात मदत केली. त्याने दुर्गम हरियाणा खेड्यातील शाळांमध्ये मुलांना त्यांच्या ऑनलाइन वर्गांसाठी स्मार्टफोन दिले. सप्टेंबरमध्ये त्यांने आसाममधील एका महिलेची ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली.