कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. ज्यामुळे पेट्रोलचे दर प्रति लीटरवर येण्याची चिन्हं आहेत. सौदी अरब आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या वादाचा फायदा भारताला होऊ शकतो. भारतात ५० रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलच्या किंमती घसरु शकतात. सध्या एक लीटर पेट्रोलसाठी आपल्याला ७५ ते ७८ रुपये लीटरच्या घरात आहेत. मात्र हे दर सुमारे २५ ते २८ रुपयांनी कमी होऊ शकतात अशी शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ३१ टक्क्यांनी घसरल्या आहेत. सौदी अरब आणि रशिया यांच्यातील संघर्षामुळे या किंमती एवढ्या खाली आल्या आहेत. सौदीचा सूड घेण्यासाठी रशियाने किंमती आणखी कमी केल्या. ज्यामुळे हे प्रमाण ३१ टक्के इतकं आलं आहे. सौदी आणि रशिया या दोहोंच्या प्राईझ वॉरमध्ये भारताचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच झाल्यास पेट्रोलची किंमत प्रती लीटर ५० रुपयांवर येणार आहे.