दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्या जवळची शस्त्रं आणि दारू गोळा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचंही उल्लंघन करण्यात आलं. ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.

दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सीमा सुरक्षा दल यांनी कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.