17 January 2021

News Flash

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, करोना चाचणी निगेटिव्ह

सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. सौरव गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक सौरवच्या डोळ्यापुढे अंधार आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी संध्याकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या आरोग्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी काल केलं होतं.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला तो प्रसंग साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. BCCI अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. करोना संकटातही IPL2020चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 8:27 am

Web Title: sourav ganguly health condition stable after angioplasty corona report negative scj 81
Next Stories
1 वॉर्नरच्या समावेशाविषयी साशंकताच
2 मुंबईच्या संघात अर्जुनचा समावेश
3 क्रिकेट सम्राज्ञी! – एलिस पेरी
Just Now!
X