11 December 2017

News Flash

गर्लफ्रेंन्डची हत्या केल्याबद्दल ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला अटक

दक्षिण आफ्रिकेचा सुवर्णपदक विजेता अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला आपल्या गर्लफ्रेंडची गोळ्या घालून हत्या

जोहान्सबर्ग | Updated: February 14, 2013 1:32 AM

दक्षिण आफ्रिकेचा सुवर्णपदक विजेता अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला आपल्या गर्लफ्रेंडची गोळ्या घालून हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली. बील्ड वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पिस्टोरियसला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. ‘व्हॅलेंटाईन डे’ला आश्चर्याचा धक्का द्यावा, म्हणून त्याची गर्लफ्रेंड त्याला न सांगता घरात आली. मात्र, कोणीतरी चोर घरात घुसला, म्हणून त्याने तिच्यावर गोळीबार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 
‘ब्लेड रनर’ म्हणून पिस्टोरियस क्रीडाविश्वात प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
दोन्ही पायांनी अपंग असलेल्या पिस्टोरियसचा समावेश टाइम मॅगझिनने जगातील सर्वात प्रेरणादायी १०० व्यक्तींमध्ये केला आहे.

First Published on February 14, 2013 1:32 am

Web Title: south african athlete oscar pistorius arrested after killing girlfriend