जगभरातील ९० देशांच्या प्रतिनिधींमधून मिस युनिव्हर्स म्हणून दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी हिची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व स्टिव्ह हार्वे यांनी टायलर पेर्री स्टुडिओ येथे झालेल्या स्पर्धेत २६ वर्षीय टुंझी ही मिस युनिव्हर्स झाल्याचे जाहीर केले. २०१८ ची मिस युनिव्हर्स फिलिपाइन्सची कॅट्रिओना ग्रे हिने टुंझीला मुकुट परिधान

केला. भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मिस इंडिया’ वर्तिका सिंग हिने पहिल्या २० जणांमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. तर मिस पोटरे रिको मॅडिसन अँडरसन ही द्वितीय तर मिस मेक्सिकन अ‍ॅश्ली अल्वीड्रेज हिने तृतीय स्थान पटकावले. पहिल्या पाच जणींमध्ये कोलंबिया आणि थायलंडच्या स्पर्धकांनी स्थान निश्चित केले. टुंझी हिने ट्विटरवर विजेती झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.