News Flash

दक्षिण चीन समुद्र: चीनकडून बॉम्बर विमाने तैनात, व्हिएतनामने भारताला दिली बिघडणाऱ्या स्थितीची माहिती

व्हिएतनामच्या हद्दीत येणाऱ्या सागरी क्षेत्रात भारताकडून गॅस ब्लॉक बरोबर तेल उत्खन्नाची अपेक्षा....

फोटो सौजन्य - अमेरिकन नेवी

चीनच्या हेकेखोरपणामुळे पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती कायम असताना तिथे दक्षिण चीन समुद्रातही चीनची दादागिरी सुरु आहे. व्हिएतनामचे भारतातील राजदूत फाम सान चाउ यांनी भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांना दक्षिण चीन समुद्रातील बिघडत चाललेल्या परिस्थिती माहिती दिली. संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगणाऱ्या चीनने तिथल्या वादग्रस्त बेटांवर फायटर आणि बॉम्बर विमाने तैनात केली आहेत.

व्हिएतनामच्या राजदूतांनी घेतलेली भेट हा एक शिष्टाचाराचा भाग होता असे राजनैतिक सूत्रांनी सांगितले. दक्षिण चीन समुद्रात तणात वाढत असताना त्यांनी व्हिएतनामची भूमिका समजावून सांगितली. हर्ष शृंगला यांच्याबरोबरच्या भेटीत फाम सान चाउ यांनी भारतासोबत ठोस व्यापक रणनीतीक भागीदारीचा संकल्प बोलून दाखवला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

वुडी बेटावर चीनने या महिन्याच्या सुरुवातीला H-6J बॉम्बर विमाने तैनात केली. वुडी हे परासेल बेटांमध्ये सर्वात मोठे बेट आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या हालचालीही इथे मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच चीनने फायटर विमानांची तैनाती केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दक्षिण चीन समुद्र विपुल साधन संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळेच चीन संपूर्ण सागरावर आपला हक्क सांगत आहे.

परासेल बेटांना व्हिएतनाम आपला हिस्सा मानतो पण ही बेटे चीनच्या नियंत्रणाखाली आहेत. बॉम्बर विमाने तैनात करुन चीन फक्त सार्वभौमत्वाचेच उल्लंघन करत नाहीय तर क्षेत्रीय शांतता धोक्यात आणत असल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. फाम सान चाउ आणि हर्ष शृंगला यांच्या बैठकीत दक्षिण चीन सागरातील घडामोडींबरोबर संरक्षण संबंधांवर चर्चा झाली. व्हिएतनाम भारताबरोबर संरक्षण संबंध विकसित करत आहे. दक्षिण चीन सागरात भारताने व्हिएतनामच्या हद्दीत येणाऱ्या सागरी क्षेत्रात गॅस ब्लॉक बरोबर तेल उत्खन्नात महत्त्वाची भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्हिएतनामने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 1:52 pm

Web Title: south china sea as china deploys bomber vietnam briefs india about deteriorating situation dmp 82
Next Stories
1 महत्त्वाची बातमी! ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा वेळेतच होणार; NTA कडून शिक्कामोर्तब
2 इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश ATS ची टीम दिल्लीत दाखल
3 भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी केलं ठार
Just Now!
X