दक्षिण कोरियातील जहाज दुर्घटनेमध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांचा समावेश असून आपत्कालीन सेवा प्रदीर्घ कालावधीनंतर मिळाल्याची शंका मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना असल्यामुळे त्यांनी मरण पावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेत १७१ जणांचा मृत्यू ओढवला.
मरण पावलेल्यांपैकी १३१ जणांचा मृतदेह अद्याप सापडले नसून जहाजाच्या अंतर्गत भागात अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ६ हजार ८२५ टन वजनाचे सेवूल हे जहाज बुडाले त्या घटनेला जवळपास आठवडा उलटून गेला असून तब्बल ४७६ लोक बुडून मरण पावले आहेत. त्यापैकी बहुतांशी शालेय विद्यार्थी असून बचावकार्य धिम्या गतीने सुरू असल्याबाबत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे.