24 October 2020

News Flash

तामिळनाडूच्या राजकारणात कमल हसनचा प्रवेश, मदुराईत ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा

मदुराईतील सभेला अरविंद केजरीवालांची उपस्थिती

कमल हसन

दाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असं आहे. आजच्या सभेदरम्यान कमल हसनने आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचंही अनावरण केलं. एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असं हसन यांच्या नवीन पक्षांचं चिन्ह असणार आहे.

दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी कमल हसन यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आपल्या पाठीराख्यांशी बोलताना कमल हसनने, आपला पक्ष जनतेसाठी काम करणार असून आगामी काळात आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे असं म्हणत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. मदुराईत सभा घेण्यापूर्वी कमल हसनने आपल्या रामनाथपुरम या जन्मस्थळालाही भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 8:54 pm

Web Title: southern actor kamal hasan launch his new party makkal needhi maiam in madurai
टॅग Kamal Hasan
Next Stories
1 “एअर इंडिया विकत घ्यायला बकरा मिळत नाहीये”
2 ताजमहाल ही कबरच! शिवमंदिर नाही – पुरातत्व विभाग
3 Loksatta Online Bulletin: बारावीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल, डीएसकेंच्या बंगल्याचा लिलाव व अन्य बातम्या
Just Now!
X