05 August 2020

News Flash

स्पेनमध्ये दिवसात सातशेहून अधिक बळी

जगभरात विषाणूचे थैमान, प्रिन्स चार्ल्स यांनाही लागण

संग्रहित छायाचित्र

स्पेनमध्ये करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बुधवारी एकाच दिवसात सातशेहून अधिकने वाढल्यामुळे तेथील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

स्पेनमध्ये एकाच दिवसात ७३८ हून अधिक बळी गेल्याने तेथील मृत्यूसंख्या ३ हजार ४३४ झाली आहे. ३२८५ बळी गेलेल्या चीनला स्पेनने मागे टाकले आहे, असे तेथील आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्या देशातील करोनाग्रस्तांची संख्या २० टक्क्य़ांनी वाढून ४७,६१० झाली असून, ५ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

स्पेनच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा दबाव आला असून, हॉटेल्सचे रूपांतर रुग्णालयांत करण्यात येत आहे, तर बर्फाच्या एका स्केटिंग रिंकचा शवागासारखा वापर करण्यात येत आहे. देशातील संचारबंदी १२ एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी केली आहे.

ब्रिटिश राजघराण्याचे वारस असलेले ७१ वर्षांचे प्रिन्स चार्ल्स यांच्यात कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांनी स्कॉटलंडमधील राजघराण्याच्या एका वास्तूत स्वत:ला विलग केले असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. त्यांची पत्नी कामिला यांची चाचणी नकारात्मक आली आहे.

इटलीत ६९ हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून, ६ हजार ८०० लोकांचा या विषाणूने जीव घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:45 am

Web Title: spain more than seven hundred victims a day abn 97
Next Stories
1 इंदूरमध्ये स्थानिक संक्रमण
2  वुहानमधील बससेवा नऊ आठवडय़ांनंतर सुरू
3 मार्चचे वेतन मिळणार; त्यापुढे काय?
Just Now!
X