News Flash

स्पेनची मिरिया लालागूना रोयो बनली ‘मिस वर्ल्ड’

मिस रशिया या स्पर्धेत दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर मिस इंडोनिशिया आहे.

यंदाच्या मिस वर्ल्ड किताबाच्या स्पर्धेत स्पेनच्या मिरिया लालगुना हिने बाजी मारली.

यंदाच्या मिस वर्ल्ड किताबाच्या स्पर्धेत स्पेनच्या मिरिया लालगुना हिने बाजी मारली. मिस रशिया या स्पर्धेत दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर मिस इंडोनिशिया आहे. दक्षिण चीनमधील हैनान प्रांतात शनिवारी रात्री ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व आदिती आर्या करत होती. परंतु तिला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. मिस इंडिया अदिती ६५व्या क्रमांकावर राहिली.या स्पर्धेत जगभरातल्या ११४ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.   मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी २३ वर्षीय रोयो स्पेन येथील बार्सिलोनाची रहिवाशी आहे. रोयो एक मॉडेलही आहे. मिस या निवडीनंतर मिरिया म्हणाली, की सर्व नागरिकांकडून मला मोठा पाठिंबा मिळाला. याचमुळे मी हा किताब जिंकू शकले. मी खूप आनंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 2:56 pm

Web Title: spains mireia lalaguna royo wins miss world title in china
Next Stories
1 सेहवाग, गंभीरचा अरुण जेटलींना पाठिंबा
2 ‘त्या’ खासदाराचे सोनियांशी संगनमत- अरुण जेटली
3 प्रशासन अजूनही आमचे दुःख समजू शकलेले नाही – निर्भयाची आई
Just Now!
X