News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेन्यूमध्ये खमन, समोसा आणि कडक चहा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपारिक गुजराती आणि इंग्रजी खाद्य पदार्थांचा मेन्यू बनवण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

सहकुटुंब भारत दौऱ्यावर येत असलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपारिक गुजराती आणि इंग्रजी खाद्य पदार्थांचा मेन्यू बनवण्यात आला आहे. यामध्ये खमन, समोसा आणि कडक चायचा समावेश आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे त्यांच्यासाठी खमन, समोसा आणि कडक चाय या खास न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

खमन, समोसा, चहा, काजू-कतली त्याशिवाय इंग्रजी खाद्यपदार्थांचा मेन्यू ठेवण्यात आल्याची माहिती शेफ सुरेश खन्ना यांनी दिली. फॉरच्युन लँडमार्क हॉटेलचे ते मुख्य शेफ आहेत. गुजरात पर्यटन विभागाने या मेन्यूला मान्यता दिली आहे. अहमदाबादमध्ये उकाडा वाढतोय त्यामुळे खाद्यपदार्थ बनवताना त्याची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे.

आणखी वाचा – मोटेरा स्टेडिअम उभारलं त्यांनाच ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे निमंत्रण नाही

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ड्रायव्हरची अशी होते नियुक्ती
जगातील सर्वात शक्तीशाली नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) ही खास गाडी तयार करण्यात आली आहे. ही गाडी केवळ राष्ट्राध्यक्षांसाठीच तयार करण्यात येते. त्यामुळे ही गाडी सर्वसामान्य नागरिक विकत घेऊ शकत नाहीत. याच कारणास्तव ही गाडी अमेरिकेतील अन्य कोणत्याही नागरिकाकडे पाहायला मिळणार नाही. विशेष म्हणजे ट्रम्प ज्यावेळी विदेश दौऱ्यावर जातात त्यावेळी ते कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) हीच गाडी घेऊन जातात.
गाडी चालविण्यात तरबेज असलेल्या व्यक्तीची कॅडीलॅक बिस्टचा (Cadillac Beast) ड्रायव्हर म्हणून नियुक्ती केली जाते. ही व्यक्ती गाडी चालविण्यात माहीर असली तरीदेखील तिला खास ट्रेनिंग दिलं जातं. तसंच या ड्रायव्हरचा रोज रिव्ह्यु आणि वैद्यकीय तपासणी केली जाते. कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) गाडीच्या ड्रायव्हरला यूएस सिक्रेट सर्व्हिस (US Secret Service) खास ट्रेनिंग दिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 11:00 am

Web Title: special menu for donald trump india visit dmp 82
Next Stories
1 मोदींच्या इंग्रजी ट्विटला ट्रम्प यांचं हिंदीत उत्तर : हम रास्ते में है
2 वेग प्रतितास १०१३ किलोमीटर, ‘या’ विमानाने ट्रम्प पोहोचले भारतात
3 मोटेरा स्टेडिअम उभारलं त्यांनाच ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे निमंत्रण नाही
Just Now!
X