देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात जाऊन आपल्या पंतप्रधापदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपू्र्त केला. आपला राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात आलेल्या मनमोहन सिंह यांनी आपल्या संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामासुद्धा प्रणव मुखर्जींकडे सादर केला. आता नव्या पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत डॉ. मनमोहन सिंह हंगामी पंतप्रधान म्हणून देशाचा कार्यभार पाहतील.
दरम्यान यापूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांनी देशातील जनतेला उद्देशून आपल्या पंतप्रधापदाच्या कारकिर्दीतील अखेरचे भाषण केले. या भाषणात त्यांनी युपीए सरकारच्या कारकिर्दीत घेतलेल्या अनेक निर्णयांचे समर्थन केले तसेचे गेल्या दहा वर्षांत युपीए सरकारमुळे देशातील परस्थिती बदलल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातसुद्धा भारताची प्रगती होत राहो, अशी आशा डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी आगामी काळात सत्तेत येणाऱ्या एनडीए सरकारला शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात नव्या सरकारला त्यांच्या कामात यश मिळावे असा आशावाद व्यक्त केला. तसेच या देशाचे नेतृत्व करणे मी माझे सौभाग्य समजतो. मला विश्वास आहे असे त्यांना सांगितले.