News Flash

‘जेट’च्या 2 हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणार ‘ही’ कंपनी

स्पाईसजेट जेट एअरवेजच्या 2 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे.

आर्थिक हबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खाजगी विमान कंपनी स्पाईसजेट जेट एअरवेजच्या 2 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. आम्ही जेट एअरवेजच्या अनेक कर्मचाऱ्यांना आमच्यासोबत जोडले आहे. यापुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या स्पाईस जेटमध्ये नियुक्त्या सुरू ठेवणार असल्याची माहिती, स्पाईस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी दिली.

आम्ही सध्या जेटच्या 1 हजार 100 कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटसोबत जोडले आहे. हा आकडा 2 हजारांवर जाईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. यामध्ये वैमानिक, क्रू मेंबर, विमानतळांवरील सेवा आणि सुरक्षेशी निगडीत कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

सध्या स्पाईस जेटच्या ताफ्यात बोईंग 737, बंबार्डिअर क्यू 400 आणि बी 737 फ्रायटर विमानांचा समावेश आहे. तसेच 62 ठिकाणी दररोज स्पाईस जेटच्या 575 विमानांचे उड्डाण होते. यामध्ये 9 आंतरराष्ट्रीय ठिकाणांचाही समावेश असल्याचे सिंह म्हणाले. तसेच मोठ्या आकाराच्या विमानांच्या उड्डांणांबाबत सिंह यांना विचारले असता, सध्या कंपनी केवळ छोट्या आकाराच्या विमानांच्या उड्डाणांवर लक्ष्य केंद्रीत करत असल्याचे ते म्हणाले. स्पाईस जेट सध्या आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आहे. तसेच जेट एअरवेजद्वारे वापरण्यात येणाऱ्या 22 विमानांना कंपनीने आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले आहे. यापूर्वी व्यवसाय ठप्प असलेल्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदी प्रक्रियेत, विद्यमान भागीदार एतिहादबरोबरच हिंदुजा समूहानेही उत्सुकता दर्शविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 11:14 am

Web Title: spice jet plans to hire 2000 jet airways employees
Next Stories
1 भाजपा आमदाराची दादागिरी, महिलेला मारल्या लाथा
2 आयसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार
3 जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, काश्मीरच्या शोपियनमध्ये चकमक
Just Now!
X