बंगळुरू येथून कोलकाताच्या दिशेने उडालेले स्पाइसजेटचे विमान एका टायर विना उतरवावे लागले. विमानातील २०४ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांसह २११ जण सुखरूप आहेत. बंगळुरू विमानतळावरून उड्डाण करताना विमानाच्या मागील भागातील एक टायर नसल्याची माहिती बंगळुरू विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने कंट्रोल विभागाला दिली. एटीसीने ही माहिती विमानाच्या पायलटपर्यंत पोहोचवली. विमानाच्या पायलटने आपले कौशल्य पणाला लावून विमान कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीवर सुखरूप उतरवले. विमानाचा एक टायर निखळून पडला अथाव फुटला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. बंगळुरू विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन वौमानिकाला टायरबाबत सांगण्यात आले, परंतू विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले.