करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउनच्या काळात लोकांचा वावर, परस्परांशी संपर्क कमी झाला. सोशल डिस्टन्सिंग सर्वत्र बंधनकारक होते. पण या सर्व निर्बंधानंतरही इस्रायलमध्ये मात्र उलट घडले आहे. इस्रायलमध्ये करोना आणि लॉकडाउनच्या काळात गुप्तरोगाच्या प्रसारात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार, २०२० सुरु झाल्यापासून क्लॅमिडियाची ८६० आणि गोनोऱ्हियाची ३१४ जणांना लागण झाली. गतवर्षीपेक्षा आता गुप्तरोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. २०१९ मध्ये याच काळात क्लॅमिडियाची ६६४ तर गोनोऱ्हियाचे २५४ रुग्ण होते. द जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे.

लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांमुळे एसटीआयच्या इन्फेक्शनचे प्रमाण कमी राहील असा अंदाज होता. पण हा अंदाज फोल ठरला आहे.