01 October 2020

News Flash

करोना संकट : २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण

४८ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दररोज ६० हजारांच्यापुढे करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ करोनाबाधित रुग्ण आढळे तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत देशात ४८ हजार ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ चोवीस तासांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६,६१,५९५ आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात ८ लाख ४८ हजार ७२८ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.७६ कोटी चाचण्या झाल्या असून १० लाख लोकसंख्येमागे १९ हजार ४५३ चाचण्या केल्या जात आहेत. या आठवडय़ात प्रतिदिन ६ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 10:10 am

Web Title: spike of 64553 cases and 1007 deaths reported in india in the last 24 hours nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 बापरे… सोनं पार करू शकतं ७० हजारांचा टप्पा; तज्ज्ञांचा अंदाज
2 पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम; मानाच्या ‘या’ यादीत चौथ्या स्थानावर झेप
3 “माझं घर का पेटवलंत?,” बंगळुरु हिंसाचारानंतर काँग्रेस आमदाराला भावना अनावर
Just Now!
X