28 October 2020

News Flash

देशात करोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाखांवर; चोवीस तासांत ६९,६५२ नव्या रुग्णांची नोंद

चोवीस तासांत ९ लाखांपेक्षा अधिक करोना चाचण्या

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चाचण्यांची संख्या अधिक होत असल्यामुळे नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ६५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने २८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ६९ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. तसंच यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. आतापर्यंतस २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ५३ हजार ८६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सध्या ६ लाख ८६ हजार ३९५ अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये देशात करोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९ लाख १८ हजार ४७० करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ६१ हजार २५२ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 9:47 am

Web Title: spike of 69652 cases and 977 deaths reported in india in the last 24 hours coronavirus health department icmr jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 पूर आणि अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या चीनच्या किनारपट्टीला धडकले ‘हिगोस’ वादळ
2 पोलीस अधिकाऱ्याने पेटीएमवरुन दोन हजारांची लाच घेतल्याचा आरोप
3 थरूर-दुबे यांची परस्परांविरोधात हक्कभंग कार्यवाहीची मागणी
Just Now!
X