10 August 2020

News Flash

श्रीशांतनेच चंडिलाला बुकींना भेटण्यासाठी मॉलमध्ये पाठवले

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेले दोन बुकी कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी काम करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

| May 16, 2013 01:39 am

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेले दोन बुकी कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी काम करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली. पोलिसांनी दिल्लीतून चार आणि मुंबईतून तीन बुकींनाही ताब्यात घेतलंय. 
सात बुकींपैकी जिंजू आणि ज्युपिटर अशी नावे असलेले दोघे जण दाऊदसाठी काम करीत आहेत. हे दोन्ही बुकी चंडिला याला गुडगावमधील मॉलमध्ये भेटले होते. सहा आणि सात मे रोजी श्रीशांत याने चंडिला याला बुकींची भेट घेण्यासाठी गुडगावमधील सहारा मॉलमध्ये पाठविले होते. बुकी आणि चंडिलामध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. त्याचे पुरावेही पोलिसांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळालीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2013 1:39 am

Web Title: spot fixing chandila was sent by sreesanth to sahara mall in gurgaon to meet the bookies
Next Stories
1 राज्यसभेसाठी मनमोहनसिंग यांच्याकडून आसाममध्ये अर्ज दाखल
2 ‘दहशतवादविरोधी कायद्याखाली मुशर्रफांविरुद्ध खटला चालवता येणार नाही’
3 कुडनकुलम प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X