इंडियन प्रिमिअर लीगमधील कथित गैरप्रकारांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी आणि स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना स्थगिती द्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.
लखनौमधील रहिवासी असलेले याचिकाकर्ते सुदर्श अवस्थी यांनी आयपीएलच्या सर्व टीमचे मालक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकारला याप्रकरणी प्रतिवादी केले आहे. आयपीएलमध्ये असंख्य गैरप्रकार होत आहेत. खेळाडूंच्या लिलावापासून या गैरप्रकारांना सुरुवात झालीये. या स्पर्धेमध्ये काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालाय. त्यामुळे त्याचा तपास झालाच पाहिजे, असे याचिकाकर्त्यांचे वकील विष्णू जैन यांनी म्हटले आहे.
तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आयपीएलच्या उर्वरित सर्व सामन्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आलीये.