News Flash

International Space Station: आज भारतातल्या काही शहरांमध्ये घडणार दर्शन

या शहरांमध्ये असाल तर तुम्हाला संधी

आंतरराष्ट्रीय अवकाश तळाबद्दल आपण ऐकून आहोत. अवकाशाशी संबंधित विविध रहस्ये जाणून घेण्यासाठी, या तळावर वैज्ञानिक नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का? पृथ्वीवरुन सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे हा आंतरराष्ट्रीय अवकाश तळ पाहू शकता. सूर्य आणि चंद्रानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश तळ हा आकाशातील तिसरा प्रकाशमान ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे पृथ्वीरुन तुम्ही सहजतेने हा अवकाश तळ पाहू शकता.

फक्त स्वच्छ आकाश आणि वेळ या दोन गोष्टी जुळून आल्यात तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अवकाश तळाचे दर्शन घडू शकते. आज भारतातील काही शहरातूनही हा आंतरराष्ट्रीय अवकाश तळ पाहता येणार आहे. गुजरातमधील राजकोट, अहमदाबाद, राजस्थानातील जयपूर आणि दिल्ली या शहरातून आज हा अवकाश तळ पाहता येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ISS चे अवकाशात भ्रमण सुरु असते. आज भारतातील काही शहरांरुन हे स्पेस स्टेशन जाणार आहे. अहमदाबाद, राजकोटमध्ये रात्री ८.३५ च्या सुमारास तर जयपूर, दिल्लीमध्ये ८.३७ च्या सुमारास हे स्पेस स्टेशन पाहता येईल. अहमदाबाद, राजकोट, जयपूर, दिल्ली या चार शहरांमध्ये सहा मिनिटांसाठी हे स्पेस स्टेशन दिसणार आहे. स्पेस स्टेशन हे आकाशातील तिसरे प्रकाशमान ऑब्जेक्ट आहे.

एखादा तारा कसा दिसतो, तशा स्वरुपात तुमच्या डोळयांना हे स्पेस स्टेशन दिसेल. पण ताऱ्यांच्या तुलनेत ISS खूप प्रकाशमान दिसेल. विमानासारखे या स्पेस स्टेशनचे उड्डाण असेल पण वेग प्रचंड असेल. वरती उल्लेख केलेल्या शहरांमध्ये तुम्ही असाल तर, प्रकाशमान ताऱ्यासारखी वस्तू आकाशात उड्डाण करताना तुम्ही पाहू शकता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:54 pm

Web Title: spotting international space station perfect sighting for ahmedabad jaipur delhi tonight dmp 82
Next Stories
1 “ती माहिती मिळवण्यासाठी गुगल मॅप्स वापरा ना”; दुबे एन्काउन्टर प्रकरणावरुन अखिलेश यांचा अजब सल्ला
2 उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
3 करोनाच्या हाहाकारात सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची वाताहत; जीडीपी ४१ टक्क्यांनी घसरला
Just Now!
X