04 December 2020

News Flash

भारतात रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ च्या चाचणीचा मार्ग मोकळा

या करारातंर्गत भारताला स्पुटनिक व्ही चे १० कोटी डोस मिळणार आहेत.

(फोटो सौजन्य - एपी)

पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारतातील औषध नियंत्रकांनी डॉ. रेड्डी लॅबला ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ रशियन लस आहे. जगात अधिकृत मान्यता देण्यात आलेली ही पहिली लस आहे. ऑगस्ट महिन्यातच रशियाने मानवी वापरासाठी या लशीला मंजुरी दिली होती.

“वेगवेळया केंद्रांवर आणि रँडम नियंत्रण परीक्षण पद्धतीने ही चाचणी करण्यात येईल. लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का? आणि रोगप्रतिकारक शक्तीला कितपत चालना मिळते ते, यामध्ये तपासले जाईल” असे डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफच्या संयुक्त निवेदना म्हटले आहे.

डिसेंबरमध्ये पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे लशीचे सहा ते सात कोटी डोस असतील तयार

या लशीची नोंदणी करण्याआधी रशियामध्ये फार कमी जणांवर या लशीची चाचणी करण्यात आली होती. डॉ. रेड्डी लॅबने सुरुवातीला भारतातील मोठया लोकसंख्येवर या लशीची चाचणी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण डीसीजीआयने त्यावर प्रश्न उपस्थित केले. आता नोंदणीनंतर स्पुटनिक व्ही ची रशियात तिसऱ्या फेजची ४० हजार लोकांवर चाचणी सुरु आहे.

सप्टेंबर महिन्यात डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफने स्पुटनिक व्ही लशीची भारतातील चाचणी आणि वितरणासाठी भागीदारी केली. या करारातंर्गत भारताला स्पुटनिक व्ही चे १० कोटी डोस मिळणार आहेत. गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे.

रशियाच्या या लशीवर जगभरातून बरीच टीका झाली होती. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती.१०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 5:25 pm

Web Title: sputnik v to undergo trial in india dr reddys gets dcgi approval dmp 82
Next Stories
1 पंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या
2 NEET 2020 : पैकीच्यापैकी गुण मिळवूनही दिल्लीची आकांक्षा पहिल्या रँकपासून दूर; जाणून घ्या काय आहे नियम?
3 ऑनर किलिंग: आंतरजातीय प्रेमसंबंधांतून वडिलांनीच पोटच्या मुलीची केली हत्या
Just Now!
X