03 March 2021

News Flash

‘स्पुटनिक व्ही’ लसही परिणामकारक

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

 

कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या चाचणीच्या अंतरिम निष्कर्षांत म्हटले आहे.

ही लस करोनाच्या प्रतिबंधासाठी ९० टक्के परिणामकारक असल्याचे, लस तयार करणाऱ्या फायझर आणि बायोनटेक या कंपन्यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितल्यानंतर सरकारने ही घोषणा केली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या २० जणांपैकी काही जणांना ही लस देण्यात आली, तर काहींना ‘प्लासिबो’ देण्यात आला. या चाचणीवर लशीच्या परिणामकारकतेचा अंदाज आधारित आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी सांगितले.

गामालय सेंटरने विकसित केलेल्या या लशीची परिणामकारकता, ती पहिल्यांदा टोचण्यात आल्याच्या २१ दिवसांनंतरच्या पहिल्या अंतरिम विश्लेषणावर आधारित आहे. लशीच्या चाचणीदरम्यान कुठलेही अनपेक्षित असे विपरीत परिणाम दिसून आले नाहीत. ज्यांच्यावर लशीची चाचणी करण्यात आली, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

फायझरच्या लशीसाठी युरोपीय आयोगाचा करार

ब्रसेल्स : बायोएनटेक व फायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या प्रयोगात्मक करोना लशीचे ३० कोटी डोस खरेदी करण्यासाठी युरोपीय आयोग (युरोपियन कमिशन) लवकरच करारावर स्वाक्षरी करणार आहे. आगामी काळात या लशीचे डोस मिळवण्यासाठी अथक परिश्रम केल्यानंतर याबाबतचा करार बुधवारी केला जाईल, असे युरोपीय महासंघाची कार्यकारी शाखा असलेल्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी सांगितले.

‘ही आतापर्यंतची सर्वात आशादायक लस आहे. एकदा ती उपलब्ध झाली, तर युरोपमध्ये सर्वत्र तिचे उपयोजन करण्याची आमची योजना आहे’, असेही लेयेन म्हणाल्या. युरोपीय आयोगाने यापूर्वीच औषध निर्माण कंपन्यांशी आणखी ३ करार केले आहेत. यामुळे संघटनेच्या २७ सदस्य देशांना या लशीच्या सुमारे १ अब्ज कुप्या मिळवणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:27 am

Web Title: sputnik v vaccine is also effective abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दोन कोटी बांधकाम कामगारांना पाच हजार कोटींची मदत
2 विकास हाच भाजपच्या यशाचा आधार!
3 भारत-चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे
Just Now!
X