बनावट चकमकप्रकरणी माझ्या विरोधात कट रचल्याचा आणि मानहानी केल्याचा आरोप करत गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटला दाखला केला. दोन दशकांपूर्वीच्या इस्र्रो हेरगिरीप्रकरणी मोदी आणि भाजपचे नेते माझ्या विरोधात विद्वेषपूर्ण मोहीम चालवली आहे, असा आरोपही श्रीकुमार यांनी केला. गुजरात दंगलप्रकरणी श्रीकुमार यांनी न्यायालयात नऊ प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. २००२मध्ये ते गुजरातच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. त्या वेळी माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचे दूरध्वनी टॅप करण्याचे आदेश मोदी यांनी आपल्याला दिले होते, असा आरोपही श्रीकुमार यांनी केला आहे. मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांनी २००९मध्ये एका महिलेची खासगी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, असेही श्रीकुमार म्हणाले.