News Flash

श्रीशांत निवडणुकीच्या रिंगणात?

आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती

S. Sreesanth : एस. श्रीशांत आता राजकारणातील नव्या इनिंगला सुरूवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे

आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरूंगवास भोगलेला भारतीय संघाचा गोलंदाज एस. श्रीशांत क्रिकेटनंतर आता राजकारणातील  इनिंगला सुरूवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणुकीसाठी श्रीशांतला केरळच्या एका ज्येष्ठ भाजप नेत्याकडून गळ घालण्यात आली असून, श्रीशांतला याबाबत विचारले असता अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्याने सांगितले. बुधवारी मी माझा निर्णय जाहीर करेन, असेही तो म्हणाला. श्रीशांत एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपसमावेशाबाबतही उद्याच माहिती मिळेल, असेही त्याने नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2016 5:28 pm

Web Title: sreesanth likely to contest on bjp ticket in kerala polls
टॅग : Sreesanth
Next Stories
1 हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या घरात घुसून विद्यार्थ्यांची तोडफोड
2 Brussels Attack : जखमींमध्ये भारतीयांचा समावेश नाही – परराष्ट्र मंत्रालय
3 Wallet Transaction Fraud : खासगी बँकेला कोटींचा गंडा
Just Now!
X