श्रीलंकेत झालेल्या साळखी बॉम्बस्फोटामुळे भारतातूनही चिंता व्यक्त केली जात आहे. कारण, श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात. आत्तापर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीय व्यक्तीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जर कोणाला मदतीची गरज पडली तर त्यांनी श्रीलंकेतील भारतीय दुतावासाशी अथवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. मंत्रालय श्रीलंकेतील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.


श्रीलंकेतील भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. +94777903082, +94112422788, +94112422789 या श्रीलंकेतील क्रमांकांवर तसेच भारतातील +94777902082 +94772234176 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीलंकेतील या साखळी स्फोटांमध्ये आत्तापर्यंत १५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर तीनशेपेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमांनी व्यक्त केली आहे.