सर्वोच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांना बुधवारी आणखी एक धक्का बसला आहे. संसदेने नवनियुक्त पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावर आज मतदान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेने पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती श्रीलंका संसदेचे अध्यक्ष कारु जयसूर्या यांनी दिली. आवाजी मतदानाने सरकारकडे बहुमत नसल्याचे सिद्ध झाल्याचे जयसूर्या यांनी सांगितले. ज्यावेळी अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरु होते. त्यावेळी राजपक्षेंचे समर्थक सभागृहाबाहेर आंदोलन करत होते.

तत्पूर्वी, मंगळवारी श्रीलंकेतील सर्वोच्च न्यायालयाने संसद भंग करण्याचा राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांचा निर्णय बदलला होता. इतकेच नव्हे तर न्यायालयाने सिरिसेना यांच्याकडून सुरु असलेली निवडणुकीची तयारीही रोखली होती. सिरिसेना यांनी २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे पद बरखास्त केले होते. त्यांच्या ठिकाणी माजी राष्ट्रपती महिंद्र राजपक्षे यांना नियुक्त केले होते. या नाटकीय घडामोडीनंतर सिरिसेना यांनी संसद भंग करत निवडणुकीचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka parliament votes against rajapakse pm wickremesinghe govt president sirisena
First published on: 14-11-2018 at 11:59 IST