11 August 2020

News Flash

व्हिसा संपलेल्यांची श्रीलंकेतून परतपाठवणी

वैध व्हिसाविना वास्तव्य करणाऱ्या १३ परदेशी नागरिकांना माऊण्ट लॅव्हिनिया येथून पोलिसांनी अटक केली

| May 4, 2019 02:25 am

साखळी स्फोटांच्या पाश्र्वभूमीवर निर्णय

कोलंबो : व्हिसाची मुदत संपुष्टात आलेल्या अथवा व्हिसाविनाच वास्तव्य करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना श्रीलंका सरकारने मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

देशात वास्तव्य करताना इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल बुधवारी पोलिसांनी दोघा भारतीय नागरिकांना राजगिरिया परिसरातून अटक केली. वैध व्हिसाविना वास्तव्य करणाऱ्या १३ परदेशी नागरिकांना माऊण्ट लॅव्हिनिया येथून पोलिसांनी अटक केली असून त्यामध्येही एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. अन्य १२ जणांमध्ये नागजेरियाचे १० तर इराक आणि थायलंडच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

व्हिसाविना अथवा व्हिसाची मुदत संपुष्टात आलेली असतानाही देशात वास्तव्य करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याचे आदेश श्रीलंकेचे अंतर्गत आणि गृहमंत्री वजिरा अबेयवर्धना यांनी गुरुवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना दिले.

त्यानुसार इमिग्रेशन अधिकारी विविध ठिकाणी छापे टाकणार असून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर मायदेशी पाठविणार आहेत. यासाठी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पोलीस आणि लष्कर सहकार्य करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2019 2:25 am

Web Title: sri lanka to deport all visa violating foreigners
Next Stories
1 ‘व्हीव्हीपॅट’ मोजणीबाबत पुढील आठवडय़ात सुनावणी
2 आता १६९ मतदारसंघांतील मतदानाकडे डोळे
3 आचारसंहिता भंगाच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये मोदींना क्लिन चिट
Just Now!
X