News Flash

धक्कादायक! श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात

बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशी नागरिकांचा ओरिजनल भारतीय पासपोर्ट बनवून त्यांना परदेशात पाठवणाऱ्या एका टोळीचा चेन्नईत पदार्फाश झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशी नागरिकांचा ओरिजनल भारतीय पासपोर्ट बनवून त्यांना परदेशात पाठवणाऱ्या एका टोळीचा चेन्नईत पदार्फाश झाला आहे. मागच्या तीन दशकापासून ही टोळी सक्रीय होती. केंद्रीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे रॅकेट उघड केले. गुंडास कायद्याखाली पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे.

खासकरुन श्रीलंकन तामिळींना पासपोर्टवर भारतीय नागरीक दाखवून परदेशात पाठवले जात होते. ट्रॅव्हल एजंट, गुप्तचर आणि पोस्टल खात्याचे कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी होते. तीन ते पाच लाख रुपयांमध्ये हे रॅकेट परदेशी नागरिकांना ओरिजनल भारतीय पासपोर्ट मिळवून द्यायचे. गुप्तचर खात्यातील कॉन्स्टेबल के. मुरुगन आणि पोस्टमन धनासेकरन यांना अटक झाल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यांनी कोणतेही ओरिजनल कागदपत्र, पुरावा नसलेल्या पंधरापेक्षा जास्त लोकांना ओरिजनल पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केली होती.

बनावट वोटर कार्ड, रेशन कार्डच्या आधारे बँक अकाउंट आणि आधार कार्ड बनवले जायचे. त्यानंतर एजंटच्या मदतीने या कागदपत्रांचा वापर करुन पासपोर्टसाठी अर्ज केला जायचा. त्यानंतर पासपोर्ट केंद्रावर अर्जदाराची मुलाखत व्हायची. त्यानंतर पोलिसवाला लाच घेऊन बनावट पत्त्याची पडताळणी करायचा. त्यानंतर पासपोर्ट पोहोचवणारा पोस्टमॅनही लाच घेऊन पासपोर्ट डिलीवरी करायचा. अशा प्रकारे पासपोर्ट मिळाल्यानंतर वीजासाठी अर्ज केला जायचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 6:43 pm

Web Title: srilankan national get indian orignal passports
टॅग : Passport
Next Stories
1 गौतमी नदीत होडी उलटून दोघांचा मृत्यू, पाच बेपत्ता
2 काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी का? – नरेंद्र मोदी
3 ‘या’ गोष्टीच्या जनजागृतीसाठी १९ वर्षीय भारतीय तरुणाने सर केला माऊंट किलीमांजारो
Just Now!
X