पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

चीनकडून अचानक झालेल्या या आक्रमक कृतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्गावरुन सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. संरक्षण दले आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल.

आणखी वाचा- चीनकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा आगळीक, भारतीय लष्कराने दिला इशारा

२९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला.

आणखी वाचा- पँगाँग टीएसओमध्ये चीनचा डाव उधळला, लडाखमधलं ८ फिंगर्स म्हणजे नक्की काय जाणून घ्या…

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता. पण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून होते. त्यामुळे या भागात संघर्षाच भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. अखेर २९-३० ऑगस्टच्या रात्री पुन्हा ही घटना घडली.

आणखी वाचा- चीन विरुद्ध युद्ध झाल्यास भारताकडे असलेली ही ‘अस्त्रे’ ठरू शकतात गेम चेंजर

भारतीय सैन्याने काय म्हटलंय…
“भारतीय लष्कर संवादाच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे मात्र याचवेळी देशाच्या प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करण्यासाठीही तितकंच कटिबद्ध आहे,” असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.