02 March 2021

News Flash

भारताच्या पराभवानंतर श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचे सेलिब्रेशन

श्रीनगरमधील नौहाटा चौकात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात आला.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले. एकीकडे भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असली तरी अंतिम फेरी गाठता आली नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परंतु भारत विश्वचषकातून बाहेर गेल्याचा आनंदही काही जणांना झाल्याचा प्रकार पहायला मिळाला. श्रीनगरमधील काही फुटीरतावाद्यांनी रस्त्यांवर फटाके फोडून भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केला असल्याचे पहायला मिळाले.

भारत विश्वचषकातून बाहेर गेल्यामुळे आनंद झालेल्या काही फुटीरतावाद्यांनी बुधवारी संध्याकाळी श्रीनगरमधील रस्त्यांवर फटाके फोडून सेलिब्रेशन केले. हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये श्रीनगरमधील काही लोक भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करत असल्याचे पहायला मिळत आहे.

श्रीनगरमधील नौहाटा चौकात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करत काही फुटीरतावाद्यांनी फटाके फोडले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. तसेच पत्रकार इस्लामुद्दीन साजिद यांनीदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या प्रकाराची माहिती देणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. भारताच्या पराभवानंतर काही फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानी नेत्यांनी आनंद साजरा केल्याचेही बुधवारी पहायला मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 1:51 pm

Web Title: srinagar separatist syed ali gilani ind vs nz india loss celebration on road jud 87
Next Stories
1 गोळ्या घालून हत्या केलेली मुलगी पुन्हा परतली, पोलिसांना दिला जबाब
2 ‘हा मनोहर पर्रीकरांचा पक्ष नाही’, मुलाची भाजपावर टीका
3 सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत; राहुल गांधींचा हल्लाबोल
Just Now!
X