09 March 2021

News Flash

अग्नितांडवात ९ जणांचा होरपळून मृत्यू; जलविद्युत प्रकल्पातील दुर्दैवी घटना

गुरूवारी मध्यरात्री उडाला आगीचा भडका

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात लागलेली आग विझवताना जवान. (फोटो सौजन्य - एएनआय)

तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात गुरूवारी मध्यरात्री अचानक आगीचा भडका उडाला होता. प्रकल्पाच्या पॉवर हाऊसमध्येच भीषण आग लागली होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री आगीची घटना कळाल्यानंतर एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांचे प्रयत्न अपयशी ठरले.

तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तिघांची ओळख पटली आहे. तिघेही सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. सुंदर नाईक, मोहन कुमार आणि फातिमा अशी ओळख पटलेल्या तीन मृतांची नावं आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये तीन कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जलविद्युत प्रकल्पामध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या घटनेची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. राव यांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले आहे. सीआयडीचे अतिरिक्त संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांनी घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल शोक व्यक्त केला. “ही घटना दुर्दैवी आहे. अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यात आले, पण त्यांचा दुःखद अंत झाला,” असं राव यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 5:47 pm

Web Title: srisailam fire 9 bodies pulled out of hydel plant in telangana bmh 90
Next Stories
1 सुशांत प्रकरणात दुबईतील प्रोफेशनल किलर्सचा सहभाग नाकारता येणार नाही; भाजपा नेत्याने व्यक्त केली शंका
2 फायटर जेटचा व्हिडीओ शेअर करत तैवानचा चीनला इशारा
3 रागाचा कडेलोट! घरगुती भांडणातून पत्नी आणि सासूची हत्या करत गच्चीवरुन फेकलं खाली
Just Now!
X