16 December 2019

News Flash

विष पिऊन त्याने पोलिसांसमोर दिली तरुणीचा गळा चिरल्याची कबुली

तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी दोन दिवसांनी विष प्राशन करुन पोलीस स्टेशनमध्ये आला व त्याने हत्येची कबुली दिली.

तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी दोन दिवसांनी विष प्राशन करुन पोलीस स्टेशनमध्ये आला व त्याने हत्येची कबुली दिली. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील खेरगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. हेथ सिंह तोमर (२१) असे या तरुणाचे नाव असून रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू झाला. हिथ सिंहने मथुऱ्याहून विकत घेतलेल्या किटकनाशकांचे प्राशन केले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी आग्र्यामधील एका निर्जन इमारतीत तरुणीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. एकत्र आत्महत्या करण्याच्या निर्णयावरुन मुलीने माघार घेतली म्हणून तिची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली. हेथ सिंह तोमरची मोठया बहिणीच्या लग्नाच्यावेळी त्याची तरुणीबरोबर ओळख झाली होती असे पोलिसांनी सांगितले.

त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते की, नाही ते स्पष्ट झालेले नाही. पण मृत तरुणी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात असल्याचे समजल्यानंतर हेथ सिंह तोमर तिला धमकावत होता. हेथ सिंहने तरुणीला फोन करुन निर्जन इमारतीच्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. येताना तिला सोबत विष घेऊन येण्यास सांगितले. पण तिने नकार दिला. हेथ सिंहने भेटायला आलेल्या तरुणीची गळा चिरुन हत्या केली व तिथून पसार झाला. “हेथ सिंह तोमर विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात आला होता. मीच माझ्या प्रेमाची हत्या केली अशी आरडाओरड तो करत होता” अशी माहिती पोलीस अधीक्षक रवी कुमार यांनी दिली.

First Published on December 3, 2019 3:03 pm

Web Title: stalker slits girls throat walks into police station consuming poison confessed crime dmp 82
Just Now!
X