भारताचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने शिक्षण घेतलेल्या शाळेत एक गैरप्रकार घडला आहे. त्याच्या शाळेतील एक शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर अश्विनने दु: ख व्यक्त केले.

पीएसबीबी शाळेतील शिक्षकाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक केल्याबद्दल अश्विनने दु: ख व्यक्त केले. अश्विन हा पीएसबीबी शाळेचा विद्यार्थी आहे. अश्विनने ट्विटरवर लिहिले, “या गोष्टीमुळे फक्त पीएसबीबीचा जुना विद्यार्थी म्हणूनच नव्हे, तर दोन मुलींचा बाप म्हणूनही मी अनेक रात्री झोपू शकलेलो नाही. शिक्षकाच्या अटकेचे प्रकरण समोर आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कारवाई करण्याची आणि सिस्टम पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे.”

हेही वाचा –  ‘किंग’ कोहलीसह इतर मुंबईकर क्रिकेटपटूंचा बायो-बबलमध्ये प्रवेश

 

अश्विन पुढे म्हणाला, “चेन्नई व आसपासच्या शाळांतून, विशेषकरुन पीएसबीबीची ही घटना ऐकून मन सुन्न झाले. इतक्या वर्षांत मी अशा बातम्या ऐकल्या नव्हत्या, परंतु या बातमीने मी फारच अस्वस्थ झालो आहे. या प्रकरणात कायदा आपले कार्य करेल. परंतु यावेळी लोकांनी पुढे येऊन सिस्टम बदलण्याची गरज आहे.”

वृत्तानुसार लैंगिक छळाचा आरोप असलेल्या शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. टीम इंडियाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी अश्विनचा भारतीय संघात समावेश आहे. २ जूनला भारती संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल.

हेही वाचा – करोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले?, हरभजनने व्यक्त केला संताप