करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते एच्छिक आहे. त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

दोन वर्गामध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची देवाणघेवाण न करणे, स्वतंत्र वेळा, शारीरिक अंतराचा नियम पाळणे आणि वर्गखोल्यांचे र्निजतुकीकरण करणे आदी मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य मंत्रालयाने आखून दिली आहेत.

इयत्ता नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनाच के वळ वर्गात आभासी अथवा शारीरिकदृष्टय़ा हजर राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तर लहान मुलांसाठी ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे मान्यतापत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळा संक्रमणक्षेत्राच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी असेल. महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर असणे गरजेचे आहे.