Covaxin या भारतात प्रथम विकसित झालेल्या कोविड -१९ लशीची लहाण मुलांवर चाचणी सुरू होणार आहे. आज (सोमवार) एम्स दिल्ली येथे स्क्रिनिंग सुरू झाले. या चाचणीमध्ये २ वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असेल. मुलांवर या लशीची चाचणी एम्स पटनामध्ये आधीच सुरू झाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) १२ मे रोजी २ ते १८ वर्षे वयोगटातील लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस मान्यता दिली.

करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच मुलांना करोना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील अधिक असेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या Covaxin या कोरोना प्रतिबंधक लशीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर लहान मुलांवर ट्रायल करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली. Covaxin लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरु करण्यात आली आहे. देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, चाचणी पूर्वी करण्यात येणाऱ्या स्क्रिनिंगची प्रक्रिया जाणून घेऊया…

  • ज्या कोणालाही चाचणीत भाग घ्यायचा असेल त्याने चाचणी घेणार्‍या एजन्सीशी संपर्क साधावा. ही चाचणी मुलांवर घेतली जात असल्याने त्यांच्या पालकांची लेखी परवानगी आवश्यक असेल.
  • केवळ निरोगी मुलेचं या चाचणीमध्ये भाग घेऊ शकतात
  • यावेळी पालकांना एक फॉर्म देण्यात येईल. त्यामध्ये मुलाशी संबंधित माहिती विचारल्या जातील.
  • तसेच मुलगा आधी आजारी असेल, काही मेडिकल हिस्‍ट्री असेल तर त्याचा तपशील द्यावा लागेल.
  • कोणत्याही प्रकारची शारीरिक अडचण असेल, ज्यामुळे चाचणीत अडथळे येतील. असे मुलं चाचणीत भाग घेऊ शकत नाहीत.
  • यावेळी एक सहमती पत्र देखील द्यावे लागेल, ज्यामध्ये लिहले असेल की, आपणास (पालक) चाचणी प्रक्रियेची माहिती दिली गेली आहे आणि आपली त्यास सहमती आहे.
  • मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात येईल

२ जूनला पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. करोना लशीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुलं आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुलं चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला. लस दिल्यानंतर या मुलांना जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. आता या मुलांना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लशीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.

चीनमध्ये मिळाला ‘Bird Flu’च्या नवीन स्ट्रेनचा रुग्ण; जाणून घ्या किती आहे धोकादायक

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देण्यात येत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील, ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील करोना उपचाराला प्राधान्य देण्यातआल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. प्राणवायू खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल.

Corona: चीनमध्ये ३ वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण!; ‘करोनाव्हॅक’ लसीला दिली मंजुरी

चीननं ३ वर्षांवरील मुलांसाठी ‘करोनाव्हॅक’ लशीला मंजुरी दिली आहे. ३ ते १७ वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ३ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सिनोव्हॅक कंपनीचे कार्यकारी अधिकारी यीन वेईताँग यांनी ही माहिती दिली आहे. ही लस कधीपासून देण्यात येईल याबाबत अजून स्पष्टता देण्यात आली नाही. चीनने देशात लसीकरणासाठी पाच लशींना मंजुरी दिली आहे.