भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने मुख्य शहरांमधील शाखांसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. किमान मासिक शिल्लक (Monthly Average Balance) रकमेची मर्यादा एसबीआयने ५ हजारांवरून ३ हजारांवर आणली आहे. तसेच किमान शिल्लक ठेवता न आल्यास आकारण्यात येणारे शुल्कही कमी करण्यात आले आहे. एसबीआयने या संदर्भातले ट्विट केले आहे.

‘सेमी अर्बन’ शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे शुल्क २० ते ४० रूपये असेल. तर मुख्य शहरांमध्ये हे शुल्क ३० ते ५० रुपये असणार आहे. हे नवे बदल ऑक्टोबरपासून लागू होतील असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे. पेन्शनर, सरकारी योजनांचा लाभ घेणारे खातेदार आणि अल्पवयीन खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही.